॥ पावन पाठ ॥
मनमोहन मुरलीवाला,
नंदाचा अलबेला.....
भक्तासाठीं तो जगजेठी,
कुब्जेसी रत जाला,
मनमोहन मुरलीवाला....
विदुरा घरच्या भक्षुनि कण्या,
परमानंदें धाला,
मनमोहन मुरलीवाला....
भक्तिसुखें सुखावला,
एका जनार्दनीं निमाला,
मनमोहन मुरलीवाला.....